महाराष्ट्र अंनिस ची मागणी
अहिल्या नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या नावा खाली मनशक्तीच्या जोरावर चमचे वाकवण्याचा दावा करणाऱ्या माधव गवळी या भोंदूवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिस मार्फत मधुकर अनाप अरुण कडू पाटील, मिलिंद देशमुख, प्रा प्रवीण देशमुख ,राहुल थोरात यांनी केली आहे अशा स्वरूपाचे निवेदन अहिल्या नगर पोलिस अधीक्षक यांना देखील देण्यात आले आहे
या विषयी प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले आहे की अहिल्या नगर येथील माधव गवळी हा व्यक्ती आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या नावाच्या खाली राजरोस भोंदू गिरी करत असून त्याचे असंख्य पुरावे त्याच्या सोशल मिडिया वर उपलब्ध आहेत
या व्हिडीओ मध्ये लहान मुलांचा वापर करून त्यांच्या माध्यमातून मनशक्तीने चमचा वाकणे सारखे भोंदू गिरीचे प्रयोग करून दाखवले जात आहेत. अशा प्रकारे आशा प्रकारे चमचा वाकवणे ही एक साधी हातचलाखी आहे अंनिसचे अनेक कार्यकर्ते ती करून दाखवतात.त्याचा व्हिडिओ देखील प्रेस नोट सोबत दिला आहे . आर्ट ऑफ लिव्हिंग इन्ट्युशन कोर्स केल्यावर मुलांची अंतशक्ती वाढते आणि ती मुले चमच्याशी बोलून त्याला वाकायला सांगतात आणि आपोआप तो चमचा वाकतो अशा स्वरूपाचे हे व्हिडीओ आहेत. हा सरळसरळ जादूटोणा विरोधी कायद्याच्या भंग असून त्यामुळे असे प्रकार राजरोस प्रकारे करणाऱ्या माधव गवळी आणि त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करावी अशी देखील मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
ह्याच बरोबर डोळ्यावर पट्टी बांधून मुलांना वाचता येते अशा स्वरूपाचे देखील धादांत खोटे दावे करणारे व्हिडिओ देखील या केंद्राच्या कडून पसरवण्यात येत आहेत.हा देखील चमत्काराचा दावा असून जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा आहे डोळ्यावर नीट पट्टी बांधली असता कुळालाही केवळ अंतशक्तीने वाचता येते असा दावा करणे ही सरळसरळ फसवणूक आहे . आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या मार्फत हा दावा केला जातो तसेच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर देखील असे व्हिडियो दिसून येतात . हातचलाखिने ह्या गोष्टी सहज करता येऊ शकतात.त्याविषयी देखील अंनिस कार्यकर्त्याने केलेले व्हिडीओ सोबत जोडले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग ने या विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी असे देखील या पत्रकात नमूद केले आहे.हेमामालिनी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्राजक्ता माळी यांच्या सारखे लोक ह्याची भोंदू गिरीची जाहिरात करत आहेत ती त्यांनी तातडीने थांबवावी अशी देखील अपेक्षा या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.
विषयाचे निवेदन अहिल्यानगर पोलिसाना दिले असून या विषयी महाराष्ट्र अनिसचे शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे .जादूटोणा विरोधी कायद्या नुसार अशा प्रकारे चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकावर स्वतः हून कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य असताना देखील अहिल्या नगरच्या मध्ये राजरोस अशी भोंदू गिरी सुरू आहे या विषयी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी देखील मागणी या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे ह्या भोंदू गिरीला बळी पडणारे बहुतांश सुशिक्षित लोक आहेत. पुण्यात नुकत्याच एका सुशिक्षित कुटुंबाला चौदा कोटी रुपयाला फसवले असल्याची घटना घडली आहे.त्या पार्श्वभूमी वर पालकांनी आपल्या मुलांना अशा भोंदू गिरी पासून वाचवावे अशी अपेक्षा देखील या पत्रकात व्यक्त केली आहे.


