जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात – विनोद शिरसाठ

इतरांना सांगा.

जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात होते असे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाच्या ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ चा वार्षिक अंक हा ‘समाजसुधारकांनी केलेली धर्मचिकित्सा’ या विषयावर काढला आहे.

विनोद शिरसाट पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि न्यायमूर्ती रानडे यांचे असे म्हणणे होते की, एखादी व्यक्ती धर्माशिवाय राहू शकते पण समाज हा धर्म संकल्पनेशिवाय जगू शकत नाही. धर्मामध्ये एखादी छोटीशी सुधारणा करण्यासाठी ही समाजसुधारकांनी अख्खे आयुष्य पणाला लावावे लागले आहे. त्यामुळे धर्मचिकित्सा करताना ती विधायक आणि संयमितपणे करावी लागेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. सुरुवातीला डॉ.दिपक माने यांनी चळवळीचे गीत सादर केले. आभार अनिल चव्हाण यांनी मांडले.

कार्यक्रमास अंनिस कार्यकर्ते गणेश चिंचोले, दिपक गिरमे, हमीद दाभोलकर, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर उपस्थित होते.

इतरांना सांगा.

प्रतिक्रिया व्यक्त करा