अर्जक संघ उत्तर प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी महाराष्ट्र अनिस राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांच्या डोंबिवली येथील घरी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी त्यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध यांचे चित्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संघाच्या अर्जक संघाच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा झाली.
या भेटीच्या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष श्री गणेश चिंचोले, लोकसत्ता मुंबई चे चीफ सब एडिटर श्री उन्मेश देशमुख हे आवर्जून उपस्थित होते.
कल्याण येथील रहिवाशी बीएनएन भिवंडी कॉलेजचे प्राध्यापक राधेश्याम मल्हाह यांच्या मुलाचा विवाह अर्जक पद्धतीने करण्यात आला. त्यानिमित्ताने अर्जक संघाचे पदाधिकारी कल्याण येथे आले होते. लग्नाची अर्जक विवाहाची पद्धत ही महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विवाह पद्धती सारखीच आहे .
पूजा-पाठ कर्मकांडांना संपूर्णपणे टाळून केवळ शपथ देवून हे लग्न लावण्यात आले.
नवरा मुलगा व मुलगी दोघेही हे एमबीबीएस, एमएस असे उच्चशिक्षित असून हा आंतरजातीय विवाह होता हे विशेष.
प्रा प्रवीण देशमुख
राज्य कार्यकारिणी सदस्य
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती



