मिरज येथे अंनिसचा हसत खेळत विज्ञान कार्यक्रम

इतरांना सांगा.

मराठा सेवा संघ,सांगली प्रणित जिजाऊ ब्रिगेड द्वारा 3 ते 12 जानेवारी 2026 ,सावित्री ते जिजाऊ हा दशरात्रोत्सव चालू आहे. त्या अंतर्गत मल्लेवाडी हायस्कूल, मल्लेवाडी येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शाखा सांगलीच्या त्रिशला शहा आणि आशा धनाले यांनी ‘हसत खेळत विज्ञान हा द्विपात्री नाट्यप्रयोग सादर केला.मनोरंजनातून विज्ञानाकडे अशा या दोन तासाच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळेसह मल्लेवाडी हायस्कूल चे सुमारे 200 विद्यार्थी रंगून गेले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या मा.प्रणिता पवार, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अम्रुतराव सुर्यवंशी,मल्लेवाडी हायस्कूल चे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला जाधव तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

– आशा धनाले, मिरज

इतरांना सांगा.