आंतरजातीय विवाहानिमित्त देशमुख कुटुंबीयांकडून अंनिस ला एक लाखाची देणगी

इतरांना सांगा.

चि. मयंक प्रवीण देशमुख, डोंबिवली आणि चि.सौ.का. मिनल कमलाकर ठाकूर अलिबाग यांच्या आंतरजातीय विवाहा प्रित्यर्थ
‘स्वागत सिवित्रीच्या लेकीचे’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा सोहळा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी ३ जानेवारी २०२६ रोजी डोंबिवली येथे आप्त परिवार व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी आंतरजातीय आंतर धर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याकरिता एक लाख रुपयांचा धनादेश अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे खजिनदार श्री अरविंद पाखले यांच्याकडे नवदांपत्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष श्री गणेश चिंचोले, सचिव श्री दीपक गिरमे,
राज्य कार्यकारिणी सदस्या ॲड मुक्ता दाभोलकर, अनिस पटवर्धन, जगदीश संदानशिव इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

इतरांना सांगा.