वारकरी संप्रदाय नेहमीच अंनिसच्या सोबत राहील- ह.भ.प. डाॅ. सुहास फडतरे महाराज

इतरांना सांगा.

सातारा येथे अंनिसच्या राज्य कार्यकारणी बैठक उद्घाटन

वारकरी संप्रदाय हा सत्य व विवेकाच्या मार्गावर चालणारा वारकरी संप्रदाय आहे. त्याच मार्गावर चालणारी
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आमची बंधुसंस्था आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय नेहमीच अंनिसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे विचार ह.भ.प. डाॅ. सुहास फडतरे महाराज यांनी मांडले. ते अंनिसच्या सातारा येथे आयोजित केलेल्या विस्तारित राज्यकार्यकारणीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

या समारंभात त्यांच्या हस्ते वारकरी संतांची अंधश्रध्दा निर्मूलनावरील विवेकी ग्रंथमाला अंतर्गत ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांनी लिहिलेल्या संतांच्या अंधश्रध्दा निर्मूलनावरील विचारांच्या दहा पुस्तिकेच्या संचाच्या पुस्तिकांचे लोकार्पण करण्यात आले.

त्याप्रसंगी लेखक देवदत्त परुळेकर म्हणाले, संतानी बुवाबाजी, भोंदुगिरी, अंगात येणे यावर परखडपणे टिका करून, मानवकेंद्रित धर्माची व्याख्या केली.

उद्घाटन समारंभात डाॅ. शैला दाभोलकर, अंनिसचे विश्वस्त गणेश चिंचोले, दिपक गिरमे, अरविंद पाखले, हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी तर आभार प्राचार्य अशोक कदम यांनी मांडले.

तसेच राज्यभरातून सुमारे तीनशे कार्यकर्ते दोन दिवसांच्या सातारा येथील राज्यकार्यकारिणीला उपस्थित आहेत.

इतरांना सांगा.