पिंपरी चिंचवडला आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान

इतरांना सांगा.

एक अनोखा, आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान “सावित्रीबाईं फुले जयंती”निमित्त ,अंनिस ग्रंथदिंडी आणि अंनिस पिंपरी चिंचवड शाखे तर्फे साजरा झाला. त्यानिमित्त
खालील महिलांचा सन्मान करण्यात आला.
१. प्रा. सुरेखा कटारिया
२. डाॅ. श्वेता राठोड
३. अंजली देशमुख
४. डाॅ. ज्योती शेट्टी
५. दिपाली पेंडसे कुलकर्णी (अमेरिका)

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना, विश्वास पेंडसे म्हणाले, अंनिसने डाॅ.नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन केले आहे. त्याअंतर्गत अशा प्रकारची व्याखानमाला ह्यावर्षी सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. ते पुढं म्हणाले अधूनमधून अश्याप्रकारचे कार्यक्रम घेण्यामुळे अंनिस चळवळीला बळकटी येणार आहे”

सर्वच आधुनिक सावित्रीबाईंचा छान परिचय ,अलका जाधव यानी करून दिला. प्रा..सुरेखा कटारिया आणि डाॅ.श्वेता राठोड यानी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृवाची मांडणी, संवाद करत करत अभूतपूर्वपद्धतीने श्रोत्यांसमोर मांडली. श्वेताने तर पोवाडा म्हणून कार्यक्रमांत रंगत आणली.

त्यानंतर दिपाली पेंडसे कुलकर्णी, यानी अमेरिकेंत चालवत असलेल्या “गुरुकुल-माझी फुलपाखरे”च्या माध्यमांतून अमेरिकेतील मराठी कुटुंबातील मुलांचे मराठीचे वर्ग कसे घेतले जातात ह्याची माहिती हसत खेळत मुलाखतीमधून दिली. अमेरिकेत मुलाना मराठी शिकण्याची गरज त्यानी अधोरेखित केले. हे सर्व उपस्थिताना आश्चर्यकारक वाटले.

अंजली देशमुख अशा स्वरूपाची बालवाडी देहूरोडला गेली कित्येक वर्ष चालवून संसाराला हातभार लावत आहेत हे सर्वाना कौतुकास्पद वाटले.

डाॅ.ज्योती शेट्टी यांनी अध्यक्षीय भाषणांत ,स्त्रियांचे शिक्षण किती आवश्यक आहे यावर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,इला पवार यानी त्याचे नेहमीच्या आकर्षक शैलींत केले. आभार मानण्याचे काम मिलिंद देशमुख यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यांत, बावनकर, सरोज पेंडसे, प्रदीप तासगांवकर, मनिषा चक्रे, इंद्रजित देसाई , अनिकेत केदारी व सर्वच कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.

  • मिलिंद देशमुख, पिंपरी चिंचवड
इतरांना सांगा.