द दारूचा नव्हे तर द दुधाचा

इतरांना सांगा.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर तर्फे आज 31 डिसेंबर हा दरवर्षीप्रमाणे द दारूचा नव्हे तर द दुधाचा हा उपक्रम विविध ठिकाणी राबवला गेला. याच्यामध्ये चला व्यसनाला बदनाम करूया म्हणत दुधा विषयीचे फायदे तसंच चांगल्या वाईट सवयी यांच्यावरती मार्गदर्शन केले.
इंदिरा गांधी विद्यानिकेतन, कपिलतीर्थ भाजी मार्केट समोर, कोल्हापूर येथील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना किरण गवळी, खगोल अभ्यासक, आणि गीता हसुरकर यांनी मुलांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रबोधन केले. प्रतिकात्मक दारूच्या बाटलीला चप्पलने मारून चला व्यसनाला बदनाम करूया हा उपक्रम राबवला. तसेच गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांचेकडून मिळालेले दूध वाटप केले.
हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी इंदिरा गांधी विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिते मॅडम आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी हा अनोखा कार्यक्रम घडवून सहकार्य केले.
तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे सीमा पाटील, रमेश वडणगे कर, आणि अनिल चव्हाण सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

इतरांना सांगा.

प्रतिक्रिया व्यक्त करा