जटेचं ओझं ‘अंनिस’ने उतरवलं.!

इतरांना सांगा.

दिघंची ता. आटपाडी येथील एका महिलेला गेल्या दहा वर्षापासून मोठ्या जटा आल्या होत्या. देवीच्या कोपाच्या भीतीने त्या जटा काढायला तयार नव्हत्या. आटपाडी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नानासाहेब पिसे यांनी या महिलेचे आणि तिच्या कुटुंबीयांचे प्रबोधन करून तिला जटा काढायला तयार केले. परवा महिलेच्या घरी नानासो पिसे यांनी जाऊन त्या महिलेच्या जटा काढल्या आणि तिला एका अघोरी प्रथेतून मुक्त केले. दशकभर असलेलं अंधश्रद्धेचं ओझं उतरवलं.

केसांमधील जटा या केसाचा गुंता केसाची अस्वच्छता यामुळे तयार होतात, त्यामागे कोणताही दैवी कोप नसतो किंवा देवीचा आदेश नसतो असे मत अंनिस कार्यकर्ते सुनील भिंगे, सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केले.

आपल्या परिसरात अशी जटाधारी व्यक्ती असल्यास कृपया महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संपर्क करावा अशा व्यक्तींचे प्रबोधन करून जटा मोफत काढल्या जातील असे आवाहन अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.

इतरांना सांगा.

प्रतिक्रिया व्यक्त करा