31 डिसेंबर 2025 द दारूचा नाही दुधाचा या उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर तर्फे गांधी चौक येथे दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन API सचिन कांडगे व डॉ.वसंत कणसे तसेच रहिमतपूर नगरीचे आदर्श पोलिस पाटील दीपक नाईक यांनी केले.
API सचिन कांडगे यांनी तरुण पिढीने व्यसनाधीनतेकडे न वळता चांगला प्रयत्न करून स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्यावे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सर्व महाराष्ट्रात कार्यरत आहे ही माणसे आपली आहेत आणि वेळोवेळी यांची मदत आपल्याला होत असते असे सांगितले. मी इथे तुमच्या नगरीत असेन किंवा नसेन परंतु आपण हा उपक्रम अजून मोठ्या प्रमाणात करू असे ही त्यांनी सांगितले. दारूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम मग तुम्ही ती कमी जास्त प्रमाणात घेतली तरी होतच असतात त्यामुळे तरुण पिढी व सर्वच लोकांनी व्यसनाच्या नादी न लागता चांगल्या सवयी, चांगले विचार अंगिकारून देशाला, गावाला व परिवाराला हातभार लावावा.
कार्यक्रमच अध्यक्षस्थानी असलेले सन्माननीय डॉ. वसंत कणसे यांनी ही व्यसन कोणते ही असो ते खराबच असते आणि याचा धोका हा शरीराला होतोच सांगत मअंनिस कामाचे कौतुक करत सदिच्छा दिल्या. दरवर्षी प्रमाणे रहिमतपूरचे आदर्श पोलिस पाटील दीपक नाईक साहेब यांनी हा उपक्रम घडवून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलत मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य. राजू सय्यद सर यांनी केले, तसेच मअंनिस हा उपक्रम घेण्या मागचा हेतू मोहसिन शेख यांनी स्पष्ट करत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी मधुकर माने, सीताराम माने, शिवाजी शिंदे, प्रवीण माने, शंकर कणसे, विजय जाधव, विपुल साळुंखे, भगवान माने, अल्कोहोलिक ॲनॉनिम्स संघटनेचे विशाल गायकवाड व इतर पदाधिकारी तसेच रहिमतपूर नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक ,नगरीतील व्यापारी वर्ग, मेडिकल विभाग, उद्योजक वर्ग, तरुण पिढी आणि रहिमतपूर पोलिस स्टेशन चे सर्व पदाधिकारी हजर होते.
- मोहसीन शेख, रहिमतपूर



