- खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये अंनिसचा कार्यक्रम
अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम हे स्वंय विकासचे काम आहे. नियमित व्यायाम वाचन व व्यसनापासून दूर राहून जीवनातील आपल्या वाटचालीत वैज्ञानिक दृष्टीकोन वापरला तर येणार्या प्रत्येक समस्येवर यशस्वी मात करता येते असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी केले. ते दि. 21/1/26 रोजी खंडाळा येथील पोलीस प्रक्षिशण केंद्रात महीला गृहरक्षक प्रशिक्षार्थी शिबिरात ते बोलत होते.
अंनिसचे राज्यकार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख पुढे म्हणाले की, डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी 1989 साली सुरु केलेल्या म. अंनिस च्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्रात जादूटोना विरोधी कायदा व सामाजिक बहीष्कार विरोधी कायदा झाला असून त्या कायद्या बाबत समाजात जन जागृती होण्याची आवश्यकता आहे.
पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यकर्ते सुभाष सोळंकी व राजू जाधव यांनी चमत्कार प्रात्याक्षिके करून दाखवली. प्रशिक्षणार्थीनां त्यामागील विज्ञान समजावून सांगितले.
प्रशिक्षण समन्वय अधिकारी पोलीस निरीक्षक संजय केदारे, पोलीस निरीक्षक आनंद रूईकर यांनी संयोजन केले. मा.श्रीहरी पाटील, उप प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

याआधी ही दि 19/12/25 रोजी साठ महीला गृहरक्षक प्रशिक्षणार्थींचे याच प्रकारचे प्रशिक्षण झाले होते. त्यावेळी विश्वास पेंडसे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रंथदिंडी लावली होती त्यावेळी अनेकांनी पुस्तके घेतली होती. यासाठी रामभाऊ नलावडे व राजू जाधव यांनी मदत केली होती.
दोन्ही प्रशिक्षणाच्या वेळी लोणावळा अंनिसचे प्रमुख कार्यकर्ते पांडुरंग तिखे व कालेकर हेही उपस्थित होते.
दोन्ही प्रशिक्षणात मिळून एकून ४१० गृहरक्षक दलातील महीला प्रक्षिक्षणार्थी उपस्थित होत्या. सर्वांनी हे प्रशिक्षण आवडल्याचे व उपयुक्त असल्याचे मत नोंदवले.



