डहाणू तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये अंनिसचे प्रबोधन कार्यक्रम

इतरांना सांगा.

शासकीय आश्रमशाळा आगवण, तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे नुकताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती पालघर जिल्हा यांच्या वतीने ,” जादुटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरज ‘ यावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.

अंनिस चे कार्यकर्ते अण्णा कडलास्कर म्हणाले की,
ग्रामीण आदिवासी भागात आजची बुवा, बाबा, भगत यांचे प्रचंड स्तोम आहे. लहान मुलांना डाम देणे (बेंबीच्या वर गरम लहान सळई ने हलके चटके देणे) हा प्रकार आजही कमी जास्त प्रमाणात इकडे चालतो. पोट दुखले, साप चावला, कावळी (कावीळ) झाली , कुत्रा, विंचू चावला. सतत आजारपण यात लोक डॉक्टर कडे कमी पण भगताकडे जास्त जातात.

अण्णा कडस्कार पुढे म्हणाले की, देवदेवस्की, भुताची भीती तर गावगावातात पसरलेली असतेच. पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार ही इकडे चालतात. या सर्व प्रकारावर चमत्कार आणि त्यामागील वैज्ञानिक सत्य सांगून मुलांना आणि शिक्षिकांना समजावून सांगितले पाहिजे.

यावेळी आदिवासी आश्रमशाळेला डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित 25 पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

इतरांना सांगा.