अंनिस साताऱ्याचा साऊ – जिजाऊ महोत्सव

इतरांना सांगा.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा शहर आयोजित साऊ – जिजाऊ महोत्सव २०२६ ला सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातुन उतम प्रतिसाद मिळत आहे.

परळी खोऱ्यातील कुस खु .गावातील जिल्हा परिषद शाळा येथे सावित्री माई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन परिसरातील इतर गावातील शालेय मुले,अंगणवाडी सेविका,सरपंच कुस खु.,महाराष्ट्र अं.नि.स.चे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या सहचारिणी डॉ.शैलाताई दाभोलकर,सातारा जिल्हा कार्याध्यक्षा वंदना माने,कार्यकर्ते डॉ.दिपक माने,पशुधन विकास अधिकारी गट- अ (परळी) डॉ. निलेश शिंदे ,मुख्याध्यापक दिलीप लादे सर,भागातील ग्रामस्थ यांचे उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस भंडारे सर यांनी तयार केलेली अंधश्रध्देवरील प्रबोधनपर लावणी शाळेतील मुलीने सादर केली. प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले. विज्ञानज्योत पाण्याचा दिवा प्रज्वलित करून प्रारंभ केला.

वंदना माने यांनी काव्यफुले काव्य संग्रह,संपादिका, लेखिका ,शास्त्रज्ञ,वैद्यकीयसेवा इ.सविस्तर माहिती देत साऊ सांगितली.तसेच जिजाऊ यांनी पुण्यात सोन्याचा फाळ लावून नांगर धरून, तेथे शेती केली तर वंश बुडी,सर्वनाश होईल अशा प्रकारच्या अंधश्रद्धा नष्ट केल्या,अमावस्येला स्वारी करण्याचे शिक्षण शिवबाना दिले ,गावबंदी मोडून “सीमोलंघन” दसऱ्याला सुरू केले,समुद्रबंदी मोडून देशातील पहिले आरमार उभारले ,संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनांना उपस्थित राहून त्यांच्या हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा अर्थात सर्व वेळा आणि दिशा शुभ असतात हे शिवरायांना शिकविले. अशा अनेक उदाहरणांसह जिजाऊ माँसाहेब यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला.

अध्यक्षा डॉ.शैलाताई दाभोलकर मॅडम यांनी भावनिक मेंदू, व्यवहारीक मेंदू सांगून फरक त्याच्या योग्य वापराने यशस्वी झालेल्या महाराणी जिजाऊ,कृतीज्योती सावित्री माई यांची माहिती दिली.

वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठीची २२पुस्तके मुलांना वाटण्यात आली डॉ.निलेश शिंदे यांनी सदर पुस्तके पुरस्कृत केली त्यावेळी विज्ञान कसे जीवनात उपयोगी हे त्यांनी मांडले.
असाच उपक्रम पुन्हा राबविण्याची मागणी सर्वांनी केली.

दि.८/१/२०२६ ,गुरुवार

  • डॉ. दिपक माने, सातारा
इतरांना सांगा.