एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सगळेजण व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा करतात, प्रेम हे फक्त प्रियकर प्रेयसी यांच्यातीलच असावे असे नाही तर ते नात्यातील कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीतही या दिवसाची संकल्पना लागू पडते. अगदी तसेच आपल्या कामावरील प्रेमाने ही व्यक्त होऊ शकते. असेच सामाजिक कार्यकर्ते उदय चव्हाण यांनी आपले प्रेम कामातून व्यक्त केले.
सुषमा जाधव यांना काही दिवसापूर्वी जट आली. हळूहळू वाढत गेली. केसाची निगा राखणे अवघड जाऊ लागले शिवाय समाजात बाहेर फिरताना थोडी लाजही वाटू लागली शिकलेले असून सुद्धा जट कशी ठेवली असे लोक म्हणतील असे वाटू लागले.
पण फॅमिली डॉक्टर साळवे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जाण्याचा सल्ला दिला त्यानुसार पतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय चव्हाण यांची भेट घेतली.
आणि पत्नीची जट काढण्यास विनंती केली. सुषमा यांच्या मनातील भीती आणि शंका उदय चव्हाण यांनी दूर केल्या आणि जट काढली.
व्हॅलेंटाईन डे.च्या निमित्ताने उदय चव्हाण यांनी कामावरील प्रेम व्यक्त केले तर सुषमाच्या पतीने सुषमा वरील प्रेम व्यक्त केले .



