वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्याचे काम करु – गीता ठाकर

इतरांना सांगा.

आज समाजात नवनव्या अंधश्रद्धा, नवी कर्मकांडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यात लोकांचे आर्थिक शोषण होत आहे‌. हे टाळण्यासाठी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना केली पाहिजे. यासाठी प्रा.प.रा. आर्डे यांचे विवेकी विचार आपल्याला उपयोगी आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ कार्यकर्त्या गीता ठाकर यांनी केले. ठाकर यांना आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली आणि आर्डे परिवार यांच्या वतीने ‘प. रा. आर्डे कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

आज अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प. रा. आर्डे यांचा तृतीय स्मृतीदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा यशवंत नगर सांगली येथे संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्त्या गीता ठाकर यांना उषा आर्डे यांच्या हस्ते ‘प. रा. आर्डे कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. रु.५००० रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमाचे स्वागत राहुल थोरात, प्रास्ताविक त्रिशला शहा, मानपत्राचे वाचन डॉ. सविता अक्कोळे यांनी केले तर आभार विनय आर्डे यांनी मानले.

या कार्यक्रमास डॉ. संजय निटवे, प्रा. अमित ठाकर, जगदीश काबरे, आशा धनाले, सुहास यरोडकर, सुहास पवार, संजय गलगले उपस्थित होते.

इतरांना सांगा.

प्रतिक्रिया व्यक्त करा